श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने राम जन्मोत्सवाचे आयोजन
बुलडाणा, दि. 04 - श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या श्री राम जन्मोत्सवाचे आयोजन याही वर्षी मंगळवार दिनांक 04 एप्रिल 2017 रोजी करण्यात आलेले आहे. सेवा प्रतिष्ठाणतर्फे दरवर्षी साजरा करण्यात येणार्या उत्सवातील पारंपारीक कार्यक्रमा बरोबरच रामनवमीचे दिवसी प्रयत्नवादी श्रीराम या विषयावर प.पू.श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे प्रवचन सकाळी 10 ते 11 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
चिखलीतील अनुराधा नगरात उभारण्यात आलेल्या भव्य श्री मुंगसाजी महाराज मंदिर परीसरात दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. अध्यात्मीक क्षेत्रातील विविध मान्यवरांची अभ्यासपूर्ण प्रचवने या कार्यक्रमाव्दारे लोकांसमोर सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून याही वर्षी मंगळवार दिनांक 04 एप्रिल 2017 रोजी प.पू.श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे प्रयत्नवादी श्रीराम या विषयावर प्रवचन होणार आहे. प्रवचना नंतर दुपारी 12 ते 2 यावेळेत उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजनही श्री मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे. तरी श्रीराम जन्मोत्सवाचे महोत्सवात सहभाग घेतांनाच प्रवचनाचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.