Breaking News

‘विश्‍वास ठेवला, चुक झाली’, म्हणत कॉगे्रसचे उठबशा आंदोलन

किमान शब्द दिल्या प्रमाणे तुरीचा शेवटचा दाणा असे पर्यंत तुर खरेदी करा - आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 28 - सत्ता मिळवायची म्हणून जनतेला अनेक आश्‍वासने दिली. मनकी बात या कार्यक्रमातून शेतकर्‍यांना भावनिक आवाहन करीत दाळवर्गीय पिकांचा पेरा वाढवा आणी देशाला स्वयंपुर्ण बनवा असे आवाहन, त्याचबरोबर चाय पे चर्चा या कार्यक्रमात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव काढून त्यात शेतकर्‍यांचा नफा जोडून भाव देवू. शेतीमालाचे असलेले हमी भाव शेतकर्‍यांना मिळतील याची उपाय योजना करू. असे प्रलोभक आश्‍वासने देशाच्या पंतप्रधानांनी शेतकर्‍यांना दिली. त्यांच्या शब्दावर शेतकर्‍यांनी विश्‍वास ठेवला आणी दाळवर्गीय पिकांचा पेरा वाढवीत देशाला बम्पर तुरीचे उत्पादन काढुन दिले. मात्र या तुरीला आज उत्पादन खर्चावर आधारीत नफा जोडून भाव तर नाहीच पण हमी भावाने तुर खरेदी करायचे वचन देवूनही तुरीची खरेदी होत नाही. अशा परिस्थीतीत शेतकर्‍यांच्या घरात तुरीचा शेवटचा दाणा असे पर्यंत शासन तुूर खरेदी करणार अशी फसवी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री व पणन मंत्री यांनी केली. मात्र आज शासन खरेदी करत नाही व बाजारात कवडीमोल भावाने तुरीला व्यापारी किमंत देत नाहीत, अशा विचीत्र परीस्थीत शेतकरी फसलेला आहे. म्हणून विश्‍वास ठेवला, आमची चुक झाली असे म्हणत शेतकर्‍यांना उठबशा घालायची वेळ आली आहे, म्हणून संपुर्ण बुलडाणा जिल्हयात तहसिल कार्यालयासमोर उदया दिनांक 29 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा कॉगे्रस कमिटीने घोषीत केल्यानुसार सर्व तालुका स्तरावर कॉगे्रस पदाधिकार्‍यासह जिल्हयातील शेतकरी उठबशा आंदोलन करणार आहेत.
दाळवर्गीय पिकाच्या संदर्भात केंद्र शासनापासून राज्य सरकार पर्यंत विद्यमान सरकारच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांप्रती केलेल्या आहवानाला भ्ाुलून राज्यात यावर्षी शेतकर्‍यांनी तुरीचे बम्पर उत्पादन काढले. परंतु शेतकर्‍यांच्या घरात तुर येताच गतवर्षी असलेले 10 हजाराचे तुरीचे भाव खाली कोसळून बाजारात 3600 ते 3700 रूपये प्रति क्विंटल भाव झाले. परंतु शासनाने जाहीर केलेले 5050 रूपये हे हमी भाव तरी पदरात पडतील या आशेने शेतकर्‍यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावर तुर नेली. मात्र 90 दिवसात 51 दिवस खरेदी बंद ठेवण्याचा विक्रम करीत शेतकर्‍यांना तुर विक्रीसाठी 2 महिने खरेदी केंद्रावर उघडयाने रात्रदिवस जावून काढावी लागली, तरीही विविध कारणे देत तुर खरेदी करण्याचे टाळण्यात आले. मुदत संपली, वाढीव मुदतही संपली, परंतु 2 महिन्यापासून शेतकरी तुर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर बसून असतांना आणी आता 22 तारखे पर्यंत ज्या शेतकर्‍यांनी तुर खरेदी केंद्रावर आनली त्यांचीच तुर खरेदी करण्यात येईल असे सांगत आज 28 तारीख उलटूनही खरेदी सुरू नाही. मुख्यमंत्री यांनी तुरीचा शेवटचा दाणा शेतकर्‍यांच्या घरात असे पर्यंत तुर खरेदी करू असे राणा भिमदेवी थाटात दिलेले आश्‍वासनही याबरोबर कोलमडून पडले आहे.  त्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे भ्राम्हक आश्‍वासनला विसंबून तुरीचा पेरा केलेल्या शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झालेला असून किमान शेतकर्‍यांजवळ असेलेली तुर तरी खरेदी करा या मागणीसाठी व पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवला, चुक झाली, पुढील वर्षी तुर पेरायची किंवा नाही असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे, असे कबुल करीत त्याचे परीमार्जन करण्यासाठी बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीच्या वतीने दिनांक 29 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हयातील सर्व तालुका स्तरावर तहसिल समोर उठबशा आंदोलन बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी घोषीत केले आहे.
या आंदोलनात बुलडाणा जिल्हयातील कॉगे्रसचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, पदाधिकारी, कॉगे्रसच्या विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी, याचबरोबर जिल्हयातील तुर उत्पादक शेतकर्‍यांनी मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.