Breaking News

चैत्र अमावस्येनिमित्त मायंबा येथे भाविकांची गर्दी

अहमदनगर, दि. 27 - चैत्र अमवस्येनिमीत्त श्री क्षेत्र मच्छीद्रनाथगडावर मच्छीद्रनाथ  समाधी दर्शनासाठी राज्याच्या विविवीध भागातुन हजारो भावीकांनी गर्दी केली होती 12 च्या आरती नंतर भावीकांना माहाप्रसादाचे वाटप करण्यात आले .भावीकांचे गर्दीने मच्छीद्रनाथ गड परीसर फुलवुन गेला .अमवस्येनीमीत्त पुणे नाशीक ठाणे कल्याण पनवेल व मराठवाडयातुन भावीकांची मोठी गर्दी होते . अमवस्येनीमीत्त येणारे सर्व  नाथ भक्त मढी मायंबा वृध्देश्वर या ठिकाणी दर्शन घेतात . मांयबा येथे देवस्थान समीतीतर्फ सुयोग्य नियोजन करण्यात आले  उन्हाळ्याची तिव्रता असल्यामुळे पाणी टंचाई सर्वत्र आहे . मायबा देवस्थान समीतीच्या योग्य नियोजन करुण येणार्‍या भावीकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती . गडावर नवनाथ पारायण सोहळा  व अखंड हरीणाम सप्ताह सुरू असुन आज 27 रोजी काल्याचे किर्तणाने सांगता होणार आहे.