इन्फोसिसच्या ‘सीओओ’ यांच्या वेतनातील वाढ कंपनीच्या परंपरेला धरुन नाही - एन.आर. नारायणमुर्ती
नवी दिल्ली, दि. 03 - इन्फोसिसच्या कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांच्या वार्षिक वेतनात केलेली वाढ ही कंपनीच्या परंपरेला धरुन नाही, असे इन्फोसिसचे सह संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती यांनी सांगितले. राव यांचे वाढीव वेतन 4.62 कोटी रुपये करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांच्या वेतनात करण्यात आलेली वाढ 1 नोव्हेंबर 2016मध्ये लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कष्टाची कामे करणा-या अन्य कर्मचा-यांच्या वेतनात केवळ 6-8 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून वरिष्ठ पदावर काम करणा-या कर्मचा-यांच्या वेतनात 60-70 टक्क्यांची वाढ करणे योग्य नाही. वेतन वाढीतील हे अंतर कमी होण्याची गरज आहे. त्यामुळे राव यांचे वेतन वाढ ही कंपनीच्या निष्पक्षतेच्या परंपरेविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले.