Breaking News

हातबॉम्ब बाळगल्या प्रकरणी श्रीनगर विमानतळावर लष्करी जवानास अटक

श्रीनगर, दि. 03 -   श्रीनगर विमानतळावर हातबॉम्ब बाळगल्या प्रकरणी एका लष्करी जवानास अटक करण्यात आली. विमानतळावर तपासणीदरम्यान या जवानाकडे दोन जीवंत हातबॉम्ब आढळून आले. पोलिसांनी जवानाला ताब्यात घेतले असून संबंधीत जवान हा श्रीनगरवरुन दिल्लीत जाण्यासाठी विमानतळावर आला होता.
पकडण्यात आलेला जवान भूपाल मुखिया  नियंत्रण रेषेजवळ उरी सेक्टरमध्ये येथे तैनात होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून माझ्या जवळ सापडलेले हातबॉम्ब हे वरिष्ठ अधिका-यांनी दिले होते, असे जवानाने सांगितले आहे . या विमानातून लष्करी जवान प्रवास करत होते.