Breaking News

सेंट विवेकानंद हायस्कूलच्या 988 विद्यार्थ्यांच्या फि डिपॉझिट खाते उघडण्याचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 04 - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या तारकपुर येथील सेंट विवेकानंद स्कूलच्या संचालकांनी मर्चटस् को-ऑप बँकेच्या तारकपुर शाखेत सुमारे 988 विद्यार्थी-विद्यार्थीनींचे फि डिपॉझिटचे खाते उघडले. याप्रसंगी स्कूलचे चेअरमन लालूशेठ मध्यान, बँकेचे अध्यक्ष चेअरमन संजीव गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कटारिया, सचिव दामोदर बठेजा, रुप मोटवानी, दामोदर माखिजा, प्राचार्या गिता तांबे, उपप्राचार्य कांचन पापडेजा, गोदावरी किर्तने, रागीणी मुंगी, विद्या जगताप व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाखेच्या प्रमुख मालिनी जाधव यांनी प्रास्तविक केले व तारकपुर ही शाखा संपूर्ण महिलांच्या अधिपत्याखाली चालते, असे सांगितले.  चेअरमन संजीव गांधी यांनी याप्रसंगी स्कूलचे पदाधिकारी, पालक, प्राचार्य यांचे स्वागत करुन या बँकेवर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल त्यांचे आभार मानले. व बँकेच्या नावलौकिकाला कायम शोभेल, अशीच सेवा यापुढेही ग्राहकांना मिळेल, असे सांगून धन्यवाद दिले. स्कूलचे चेअरमन लालूशेठ मध्यान यांनी बोलतांना सांगितले की, या स्कूलची स्थापना 1967 पासूनची असून, 1980 सालापासून स्कूल यशस्वीरित्या सुरु आहे. दरवर्षी 1000 ते 1200 विद्यार्थी येथे प्रशिक्षित होतात. व पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे स्कूल सर्वांच्या पसंतीस उतरले असल्याचे सांगितले.