Breaking News

संगमनेरात रमाई उद्यान व ध्यान केंद्र उभारणार- सौ. तांबे

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 24 - संगमनेर शहरात नगरपालिकेच्यावतीने लवकरच रमाई उद्यान व त्यामध्ये ध्यानकेंद्र सुरु करणार असल्याची घोषणा  नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा करुन संगमनेरकरांना सुखद धक्का दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने माता रमाईचे मोठे योगदान आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्व घडणीमध्ये त्यांचा त्याग खूप मोठा आहे. म्हणून त्यांच्या नावाने संगमनेरात मोठे उद्यान व्हावे ही आपली तसेच आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती. तसेच समाज बांधवांनाही एकत्रित येवून विधायक कार्यक्रम करता यावीत यासाठी येथील व्यवस्थेचा मोठा उपयोग होणार आहे. त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात चांगली जागा पालिकेच्यावतीने निवडण्यात येणार आहे. ध्यान केंद्र तसेच विपषणा साधनेच्या संदर्भात तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेवून हे ध्यान केंद्र अद्यावत करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीची देखील व्यवस्था शहर पालिकेच्यावतीने करण्यात येईल असे सांगतांनाच महामानव डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांचे स्मारक व स्पर्धा परिक्षांसाठी चांगले मार्गदर्शन केंद्र व्हावे यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील सरकारी जागा मिळावी व त्यासाठी बाबासाहेबांचे चांगले स्मारक व्हावी ही अनेक वर्षापासूनची समाज बांधवांची मागणी आहे. त्यासाठी देखील आपले नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावर आपण ही जागा मिळावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतांना समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीत अधिक जागृती व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीकांची तसेच विविध विषयातील तज्ञांची व्याख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित केली जातात. हा अतिशय स्तुत्य उपक्रम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बी. आर. कदम, श्रीमती कुसुमताई माघाडे, के. एस. गायकवाड, श्री. बनसोडे,  प्रा. शशिकांत माघाडे, गौतम गायकवाड यांच्रासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशिल असतात. अशा संस्थेला सर्वांनी एकत्रित येवून पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संगमनेर नगरपरिषद व येथील सर्व संस्था त्यांना अशा उपक्रमांना नेहमी मदत करेल असे आश्‍वासन दिले.
यावेळी प्रास्ताविकात शशिकांत माघाडे यांनी संगमनेरचे नेतृत्व विधायक आणि विकास कामांच्या सतत पाठीशी उभे रहाते. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी केलेला संकल्प निश्‍चीतच पूर्ण होईल असा विश्‍वास व्यक्त करुन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.