Breaking News

पश्‍चिम रेल्वेवरील भाईंदर, वांद्रे, परळ स्थानकांची नावं मराठीत

मुंबई, दि. 24 - पश्‍चिम रेल्वेवरील स्थानकांच्या नावांच्या मराठीकरणासाठी अखेर रेल्वेनं पाऊल उचललं आहे. भाईंदर, वांद्रे, परळ या रेल्वे स्टेशन्सची नावं आता मराठीत होणार आहेत.
भाईंदर, वांद्रे, परळ अशा अनेक रेल्वे स्थानकांच्या नावांचा हिंदी वा इंग्रजीतून अपभ्रंश केला जातो. त्यामुळे त्यांच्या मूळ नावांऐवजी भायंदर, बांद्रा आणि परेल असं संबोधित केलं जातं. मात्र त्याऐवजी या रेल्वेस्थानकांच्या नावाची उद्घोषणा, त्यांचे नामफलक हे मराठीतूनच असावे, अशी मागणी होती. पश्‍चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागानं मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या रेल्वे स्थानकांच्या मूळ महसुली नोंदी असलेली मराठी नावं मागवली आहेत. पश्‍चिम रेल्वेच्या या पावलानं मराठी एकीकरण समितीसह अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे.