पोटच्या गोळयाला फेकून पळणारी माता पोलिसांच्या जाळ्यात
लातूर (प्रतिनिधी), दि. 24 - पोटच्या अवघ्या सात महिन्यांच्या बाळाला रात्रीच्या अंधारात टाकून शुक्रवारी मध्यरात्री शहरातून पसार होण्याचा प्रयऋकरणारी एक निर्दयी माता संशयास्पद स्थितीत येथील शहर पोलिसांना मिळून आली. मात्र पोटच्या बाळाला न ओळखणार्या या मातेला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते बाळ आपलेच असल्याचे कबूल केले.
उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील एक विवाहिता 18 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून निघून गेल्याची मिसिंगची फिर्याद तिच्या सासर्याने वाढवणा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान शुक्रवारी रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ.पी. एस. सोनकांबळे हे शहरात गस्तीवर असताना मुक्कावार चौक येथे एक 23 वर्षीय तरुण विवाहित महिला संशयास्पदरित्या फिरत असताना मिळून आली. त्या महिलेस रात्री शहर पोलीस ठाण्यात आणून बसवण्यात आले. दरम्यान शनिवारी (दि. 22) सकाळी 7 वाजता उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात एक सात महिन्यांची मुलगी एका ठिकाणी पडलेली रडताना दिसली. एका जागरुक नागरिकाने हा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. पण रेल्वेची हद्द नसल्याने शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड यांनी तात्काळ कर्मचारी पाठवून त्या बाळास पोलीस ठाण्यात आणले. बाळाला रात्रभर डासांनी चावा घेतल्याने त्याची आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.
या प्रकारानंतर त्या महिलेची चौकशी सुरु झाली. तेव्हा आपण वाढवणा येथील असल्याचे तिने सांगितले पण अधिक माहिती देण्यास ती टाळाटाळ करु लागली. पोलिसांनी या महिलेबाबत वाढवणा पोलिसांकडे चौकशी केली असता एक 23 वर्षीय तरुण विवाहिता आपल्या सात महिन्याच्या बाळासह निघून गेल्याची मिसिंगची नोंद असल्याची माहिती मिळाली. या विवाहितेचे वय तर मिळते-जुळते आहे. पण तिच्याकडे बाळ नाही. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच ते बाळ आपलेच असल्याचे तिने कबूल केले. याचवेळी तिला तिच्या मोबाईलवर अनेक फोन येत होते. पोलिसांनी तिला विचारले असता रेल्वे स्टेशनवर एकजण थांबला असून आपण हैदराबादला जाणार असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी त्या तरुणासही पकडून आणले. याप्रकरणी त्या दोघांनाही अधिक तपासासाठी वाढवणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
त्या सात महिन्याच्या दुर्देवी बाळाला तिची आई मिळवून देण्यासाठी हा प्रकार उघड करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणोदार कामटेवाड, सपोनि सुधीर सूर्यवंशी, कर्मचारी पी.एस. सोनकांबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, आर. जी. लामतूरे, विनायक कांबळे, रमेश बिर्ले यांनी सतर्कता दाखवली. या प्रकरणाचा अधिक तपास वाढवणा पोलीस करीत आहेत.