Breaking News

त्या शेतकर्‍याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च पालकमंञी करणार

लातूर (प्रतिनिधी), दि. 24 - निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथिल शेतकरी शिवराज बाळुराम सुर्यवंशी यांनी दिनांक 20 रोजी मुलीच्या लग्नाचा खर्च झेपत नाही म्हणून आपले जीवन संपवले होते.त्या शेतकर्‍याच्या मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च व कन्यादान स्वतः कामगार कल्याण मंञी तथा लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर करणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबुलगा येथिल शेतकरी शिवराज सुर्यवंशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च झेपत नाही मुलाचे शिक्षण चार एकर जमीन यावर भागत नसल्याने एवढा मोठा खर्च कसा करायचा या सर्व आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवले होते.चार एकर जमीन असूनही तो मजूरी करत होते.येत्या 28 तारखेला कूंकवाचा कार्यक्रम गावातच होता उदगीर येथून कपडे किराणा खरेदी केली होती परंतु पैशाचा ताळमेळ लागत नसल्याने वैतागून त्यांनी मृत्यूला कवटाळले होते.
या सर्व बाबीची दखल घेत कामगार कल्याण मंञी लातूरचे पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिनांक 22 रोजी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबियाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांतवन केले व मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलून स्वतः कन्यादान करणार आहे व दोन्ही शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याची माहिती  बोलताना दिली.