छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 12 जवान शहीद
रांची, दि. 24 - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले आहे, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत
आज सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात 7 जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान दीड महिन्यापूर्वीच 11 मार्च 2017 रोजी सुकमा जिल्ह्यातच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 12 जवान शहीद, तर 3 जवान जखमी झाले होते. नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या कामात गुंतलेले असताना घातपातानं 12 जवानांवर हल्ला केला होता.