कुंभेफळला आज यात्रोत्सव
अकोले, दि. 28 - महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान शेषनारायणची यात्रा आज दि. 28 रोजी अक्षयतृतीयचे दिवशी कुंभेफळ (ता. अकोले) येथे होत आहे.
देशभर शेषनारायण ची अनेक मंदिर असून त्यापैकी शेष व नारायण यांचे एकत्र मंदिर काशी नंतर फक्त महाराष्ट्रात कुंभेफळ येथे आहे अतिशय विलोभनीय मंदिर जमिनीपासून 28 मीटर उंचीचे आहे. पुण्यस्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. 1767 मध्ये केला याठिकाणी एक बारव ही त्यांनी बांधली आहे. यावरून या मंदिराचे महत्व विषद होते. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर असणारे हे देवस्थान अनेक भविकाचे श्रद्धास्थान आहे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षयतृतीयाच्या तिथीला हा यात्रामोहत्सव साजरा होतो सकाळी 7 वाजता अभिषेकाने यात्रा प्रारंभ होतो दुपारी 12 वा पर्यंत अभिषेक असतात सायं 7 वाजता काठीची मिरवणूक पारंपरिक वाद्यवृंदाच्या तालावर काढण्यात येते काठी मंदिराजवळ अलेवर वाण वही गायले जातात हे ऐकनेसाठी भाविक गर्दी करतात रात्री मनोरंजनसाठी महाराष्ट्रची लोककला तमाशा सादर केले जातो दुसर्या दिवशी सकाळी हजेरी व सायंकाळी कुस्त्यांचे जंगी हंगामा होतो त्यास महाराष्ट्रतील नामवंत मल्ल हजेरी लावतात.