बाहेरून येणार्या नागरिकांच्या चौकशीची पोलिसांकडे मागणी
पुणे, दि. 27 - कुदळवाडी परिसरात बाहेरून येणारे फेरीवाले, सेल्समन आणि अनोळखी व्यक्तींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी पोलिस उपनिरीक्षक वीरेंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात यादव यांनी चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या अनेक ठिकाणी दरोड्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कुदळवाडीतील नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे. हा परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. परराज्यातील हजारो नागरिक येथे वास्तव्याला आहेत .त्यामुळे या भागात अनोळखी व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशा अनोळखी व्यक्तींची चौकशी करावी. तसेच या भागात फिरणारे फेरीवाले, सेल्समन यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.