तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री
पिंपरी, दि. 27 - शेतकर्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. विरोधकांची संघर्षयात्रा असेल, तर आम्हीही संवादयात्रा काढू, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
पिंपरीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, संघर्षयात्री ती होती, जी गोपीनाथ मुंडेंनी काढली. ज्यांच्या संघर्षयात्रेने सत्ताधार्यांना शह देऊन परिवर्तन घडवलं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकर्यांना माहिती आहे, आमचं जे नुकसान झालंय ते फक्त यांच्यामुळेच झालं आहे. त्यामुळे शेतकर्यांचाही या संघर्षयात्रेला फारसा प्रतिसाद नाही. असं विरोधकांपैकीच काही जण मला येऊन सांगतात, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला.