उरुळी देवाची व फुरसुंगीचा कचरा प्रश्न मार्गी लावण्यासासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - महापौर
पुणे, दि. 27 - उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी मागील दहा दिवसांपासून कचरा टाकू देत नसल्याने आज महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. मात्र, यावेळी विरोध कायम राहिल्याने हा कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये ग्रामस्थ टाकून देण्यास मागील 10 दिवसापासून विरोध करीत आहे. कचरा प्रश्न मार्गी लागवा. यासाठी महापौर आणि प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आल्या. मात्र, त्यांचा पहिल्या दिवसापासून विरोध कायम असून आज पुन्हा महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांशी कचरा डेपो येथे जाऊन चर्चा केली.
मात्र यावेळीही, तुमचा कचरा येथे टाकू देणार नाही. तसेच कचरा डेपो बंद करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आजची बैठकही निष्फळ ठरली. यावर महापौर मुक्ता टिळक या पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात जाऊन कचरा प्रश्न मार्गी लागण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या चर्चेतून कचरा प्रश्न मार्गी काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आता मुख्यमंत्री काय मार्ग काढतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मागील 10 दिवसांपासून शहरातील कचरापेटया वाहत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.