समाजाच्या छाताडावर नंगानाच करणार्या वामनांच्या नाकात वेसण घालावी लागेल!
दि. 28, एप्रिल - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...महाराष्ट्र समाज चळवळीत उपर्यांचा हस्तक्षेप वाढल्याने अवघी चळवळ दलालांच्या हातचं बाहुलं बनली आहे. समाज घडविण्यासाठी फुले शाहु आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य स्वाक्षरी केलेला कोरा चेक एखाद्याच्या हाती सोपवावा अशा पध्दतीने चळवळीला बहाल केले. चळवळ घडली.नावारूपाला आली. चळवळीची फळं समाजाच्या ताटात मांडली जाण्याची वेळ आली बाजारबुणग्या उपर्या दलालांचा चळवळीत शिरकाव झाला.
समाज सुधारणा करण्यासाठी महापुरूषांनी चळवळीला विचारांची शिदोरी देऊन चळवळीला श्रीमंती तर दिलीच स्थावर पातळीवर देखील चळवळीच्या पर्यायाने समाजाच्या मालकीची मालमत्ता ऊभी केली.आपल्या पश्च्यात चळवळीच्या उदरनिर्वाहासाठी तोशीस पडू नये,समाजावर विशेष भार पडू नये हा यामागे या मंडळींचा उद्देश होता. महत कष्टाने उभी केलेली मावमत्ता आणी समाजाच्या विकासाठी दिलेली विचारांची शिदोरी या मंडळींनी राजकारणाच्या बाजारात लिलावासाठी ठेवली. परिणाम काय झाला हे आपल्या समोर आहे.
फुले असोत, शाहू असोत नाहीतर डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा केवळ स्वार्थासाठीच वापरणार्या दलालांची जातकुळी सध्या समाजकारणात हैदोस घालीत आहे. विचार तर केंव्हाच विकून राजकारण्यांच्या गव्हाणीत टाकले आहेत. महापुरूषांनी पोटाला, संसाराला चिमटा काढून समाजाच्या उत्कर्षासाठी लढणार्या चळवळीचे व्यासपीठ उभे केले. चळवळीच्या मालकीची मालकीसाठी संपत्तीदेखील उभी केली. या संपत्तीलाही या दलालांनी बाजारात आणले, कमरेचं सोडून भर लोकवस्ती नंगानाच करू पाहणार्या या सफेदपोश दलालांच्या नाकात घालण्याचं धाडस आता समाजाला दाखवावं लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चा असो नाहीतर बहुजन क्रांती मोर्चा साप साप अशी आवई उठवून समाजाला भूई बडविण्यास लावणार्या या पाप्यांनी समाजात व्यवस्थेविरूध्द निर्माण झालेल्या असंतोषही राजकारण्यांना विकला. आजच्या या सामाजिक चळवळीच्या पार्श्ववर डा.प्रकाश आंबेडकर, पुरूषोत्तम खेडेकर,म.ना.कांबळे ही मंडळी जे सांगत आहेत ते आगदीच तथ्यहीन नाही.त्यामागे लपलेला गर्भीत अर्थ समाजाने लक्षात घ्यायला हवा.या मंडळींच्या मनात सलत असलेली सल समजून घ्यायला हवी. मराठा आरक्षण असो, जाती अंतांची लढाई असो हे मुद्दे गांभिर्याने समाजाने समजून घ्यायला हवेत.ज्या दिवशी समाज या कळीच्या मुद्यांवर पुर्णपणे साक्षर होईल त्या दिवशी समाजात वावरणार्या आधुनिक वामनाच्या रूपातील हस्तक दलालांचे नंगानाच कलाणारे सारे अवयव समाज छाटल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.