संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर प्रश्न उपस्थित करण्यास भारताकडून आक्षेप
वॉशिंग्टन, दि. 28- पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल भारताकडून आक्षेप घेण्यात आला आहे. काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय प्रश्न असून तो मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात उपस्थित करणे चुकीचे असल्याचे भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानचे प्रतिनिधी मसूद अन्वर यानी 25 एप्रिल रोजी माहिती समितीच्या संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, काश्मीरच्या जनतेला मदत करा. काही शक्तींकडून काश्मीरी जनतेला त्रास होत आहे, असे अन्वर महासभेत म्हणाले होते. त्यानंतर भारताचे स्थायी प्रतिनिधी एस.श्रीनिवास प्रसाद यांनी अन्वर यांचे बोलणे अर्ध्यावर थांबवून काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र संघात उपस्थित करण्याबाबत विरोध दर्शवला.