Breaking News

सर्वाधिक तूर विकणार्‍या एक हजार शेतकर्‍यांची चौकशी!

मुंबई, दि. 28 - ज्या शेतकर्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांचीच तूर खरेदी करण्यात येईल, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर जवळपास 5 दिवसांनी त्याचा जीआर निघाला. यानुसार सरकार केवळ 10 लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे.
22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आलेली तूर एकूण अंदाजे 10 लाख क्विंटल एवढी आहे. त्यामुळे 10 लाख क्विंटल तुरीचाच शेवटचा दाणा खरेदी केला जाईल, हे स्पष्ट झालं आहे. शिवाय याच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.