Breaking News

स्वाईन फ्ल्युला नागरिकांनी घाबरु नये- अनुराधा आदिक

श्रीरामपूर, दि. 27 - स्वाईन फ्ल्यु या आजाराला नागरिकांनी घाबरु नये, योग्य काळजी व वेळेवर उपचार घेतल्यास स्वाईन फ्ल्यु पुर्णपणे बरा होतो असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
पालिकेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद यांच्यावतीने नागरिकांचे स्वाईन फ्ल्यु या आजाराविषयी जनजागृती करावी यासाठी शहरातील विविध तज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात नगराध्यक्षा आदिक बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेवक राजेंद्र पवार, रवि पाटील, मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास आढाव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंतराव जमदडे, आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, कामगार हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र जगधने, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता राऊत, सुधा कांबळे, आदित्य आदिक आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील प्रतिथयश डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. राजेंद्र गोंधळी, डॉ. संजय अनारसे,  डॉ. गिदवाणी, डॉ. दिलीप पडघन, डॉ. देशपांडे आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
 नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या की, स्वाईन फ्ल्यु आजाराला नागरिकांनी घाबरु नये या आजारावरतील कायमस्वरुपी औषधे उपलब्ध झाली आहेत. नागरिकांनी आपला परिसर, आपले घराचे आंगण स्वच्छ ठेवावे. ज्याने कुठल्याही आजाराला चालना मिळणार नाही.सदर कार्यशाळेत प्रथमतः आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्वाईन फ्ल्यु या आजाराविषयी पावर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. तसेच स्वाईन फ्ल्यु या आजाराविषयी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य केंद्राच्या सुनिता राऊत यांनी केले. सुत्रसंचालन एन.पी.सलालकर यांनी केले. तर आभार डॉ. दिलीप पडघन यांनी मानले.