Breaking News

देवतांची विटंबना केल्याप्रकरणी संगमनेरात दोघांना अटक

संगमनेर (प्रतिनिधी, दि. 27 -  सोसाल मिडीयावरुन देवदेवतांची विटंबना केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दोघा समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने सोसल मिडीयावरुन देवतांची विटबंना करणारे छायाचित्र प्रसारीत केले होते. एका समाजाच्या काही तरुणांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ते त्वरीत शहर पोलीस ठाण्यात आले. पोलिसांना ही माहिती देवून संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलीस उपाधिक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले. या संदर्भात राहूल नेहूलकर यांनी फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अवेजखान रसिदखान (रा. रहेमतनगर) व रझिम बिलाल शेख (रा. विजयनगर) या दोघांना अटक करुन त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर या दोघांना हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.