Breaking News

ग्रामीण जनता संगणक साक्षर असणे व्यावहारिक जीवनात गरजेचे - मिलिंद कुलकर्णी

अहमदनगर, दि. 27 - बदलत्या काळात इंटरनेट मुळे जीवन गतिमान झाले असून देशात डिजिटल युग अवतरले आहे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होण्यास सुरुवात झाली असली तरी सर्वच ग्रामीण जनता संगणक साक्षर नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी संगणक साक्षर असणे व्यावहारिक जीवनात गरजेचे आहे त्यासाठी केंद्राच्या मोफत लील केंद्रात संगणकीय प्रशिक्षण ग्रामीण जनतेने घ्यावे असे मत भाविनिमगाव सेवा सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या संगणकीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्री कुलकर्णी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय िासवळीहर राज्य समन्वयक श्री हनुमंत म्हस्के होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लील जिल्हा समन्वयक सतीश खरड, जिल्हा समन्वयक मनोज गुंड, महा ई सेवा तालुका समन्वयक असिफ सय्यद, प्रकाश गायकवाड, नवनीत वांढेकर, कामगार तलाठी श्री पाटील, ग्रामीण वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब सुपेकर, शिवाजी खरड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी लील केंद्रामार्फत दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणाची माहिती व दैनदिन जीवनात संगणकीय ज्ञानाचे महत्व याबाबत केंद्रप्रमुख श्री सोपान जाधव यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले यावेळी प्रा भागवत जरे, अशोक जाधव, हरी करवंदे, महादेव काळे, संदीप करवंदे, ताराचंद जाधव, भारत व्यवहारे, संतोष झोडगे, पांडुरंग काळे, दत्तात्रय जरे, सावता गादे, रामदास चेडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्‍वर जाधव यांनी केले तर आभार सोपान जाधव यांनी मानले.