महिलांनी व्यवसायात ध्येयाने प्रेरित होऊन काम केल्यास यश मिळेल
अहमदनगर, दि. 25 - बाजारात अनेक फायनान्स कंपनी आहेत. केवळ सुलभ कर्ज मिळते म्हणून ते न घेता व्याजदर तपासून घ्यावे. व घेतलेल्या कर्जाचा वापर महीलांनी व्यवसायकरीता करून ध्येयाने प्रेरित होऊन स्वावलंबी व्हावे व आपल्या गटाची व कुटुंबाची प्रगती प्रगती साधावी असे आवाहन विजया बँकेचे कार्यकारी अधिकारी योगेश उपासनी यांनी महीला गट मेळाव्यात केले.
येथील महावीर मंगल कार्यालयात एच यु गुगळे पतसंस्थेच्या वतीने महीला गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपासनी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक महेश गायकवाड होते. यावेळी एच यु गुगळे पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ गुगळे, विजया बँकेचे संचालक आशुतोष माळी, प. स. सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मेहरूनिस्सा कुरेशी, सेंट्रल बँकेच्या शाखाधिकारी मोनाकुमारी, नगरसेवक चव्हाण, लेबर संचालक मनोज कुलकर्णी, पतसंस्थांचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, अंबिका महीला बचत गटाच्या अध्यक्षा कमलाताई परदेशी व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशुतोष माळी पूढे म्हणाले, की एच यु गुगळे पतसंस्था सामाजिक बांधिलकी असलेली संस्था आहे. या संस्थेच्या व्यवस्थापनाने आमच्या विजया बँकेत येऊन अडीच हजार महीला बचत गटाच्या माध्यमातून चालू असलेला उद्योग पाहून जामखेड येथील महिलांची उन्नती करण्यासाठी येथे महीला गटाचा मेळावा आयोजित केला. महीलांनी याचा लाभ घेऊन व्यवसायात उतरावे. बँकेच्या साहाय्याने. तुमच्या कुटुंबाची समाजात पत ठेवून प्रगती करावी असे माळी म्हणाले. एच यु पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेची भूमिका मांडली. शितल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले व संस्थेचे अधिकारी जूबेर पठाण यांनी आभार मानले.