महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ’महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार’ प्रसिध्द राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार 21 वा असून स्मृती चिन्ह शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
10 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता वाई येथे रा. ना. चव्हाण यांच्या 24 स्मृती दिनी, येथील ब्राह्म समाज येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले व ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रा. डॉ. चौसाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्रनाथ चव्हाण, अन्य विश्वस्त सतीश कुलकर्णी, रमेश चव्हाण, शरद चव्हाण उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. डॉ. सदानंद मोरे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कॉ. रमेश कोलवाळकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी रमेश चव्हाण संपादीत ’महर्षि विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग 1) या रा. ना. चव्हाण यांच्या लेख संकलनाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी द. दि. पुंडे व प्रा. डॉ. निशा भंडारे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर) ते राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक व राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. वैचारीक साहित्याच्या क्षेत्रातील ते नावाजलेले अभ्यासक आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी संशोधन व वैचारीक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांम त्यांनी विपूल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे.