मागणी येईल त्या गावात टँकर द्या : सहपालकमंत्री
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : टंचाईच्या काळात प्रशासनाने गतीमान होऊन ज्या गावातून टँकरची मागणी येईल त्या गावाला तात्काळ टँकर मंजूर करा, अशा सूचना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
माण, खटाव पाणी टंचाई आढावा बैठक वडूज पंचायत समितीच्या बचत सभागृहात सहपालकमंत्री खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, माणच्या तहसीलदार सुरेखा माने, खटावच्या तहसीलदार सीमा होळकर, वडूज पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, माणचे गटविकास अधिकारी रवींद्र सांगडे, खटावचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, वडूज पंचायत समितीचे उपसभापती कैलास घाडगे, धैर्यशील कदम, बाळासाहेब मासाळ यावेळी उपस्थित होते.
ग्रामसेवक, तलाठी व मंडलाधिकारी यांनी माण व खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांची संयुक्त पहाणी करावी व टंचाईबाबत अहवाल तात्काळ गट विकास अधिकार्यांकडे सादर करावा, अशा सूचना करुन खोत म्हणाले, या कामात हयगय केल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलाबाबत येत्या गुरुवारी ऊर्जा मंत्र्यांशी बैठक घेऊन वीज बिलाबाबतचा प्रश्न सोडविण्यात येईल. अधिकार्यांनी टंचाईबाबत माण आणि खटावची 15 दिवसाला स्वतंत्र बैठक घेऊन त्याचा अहवाल मला सादर करावा. जयलुक्त शिवार अभियानांतर्गत दोन महिन्याच्या कालावधीत झालेल्या कामांची मी पहाणी करणार आहे, असे सांगून सहपालकमंत्री खोत पुढे म्हणाले, भोसरे ता. खटाव या गावात जयलुक्त शिवारची कामे मंजूर करण्यात आली होती. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथे कामे होऊ शकली नाहीत. या कामांना मुदत वाढ देण्यात येवून संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करुन तसा अहवाल मला द्यावा. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांना कुठे गळती असेल किंवा निकृष्ट दर्जाचे काम असेल अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे. पाणी अडवा व पाणी जिरवा या उद्देशाने योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांचे 7/12 वर नोंद करणे आवश्यक आहे. तलाठ्यांनी प्रत्येक गावात जावून वारस नोंद करावी. यामुळे शेतकर्यांच्या वारसांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल. महाराजस्व अभियानांतर्गत माण व खटाव तालुका पाणंद रस्ते मुक्त करुन येथील पाणंद रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावे. आपण जनेतेचे सेवक आहोत याची जाणीव ठेवून अधिकार्यांनी टंचाईच्या काळात जागृत राहून कामे करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीत माजी आमदार डॉ. येळगावकर, घार्गे यांनी अधिकार्यांना टंचाईसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांविषयी सूचना केल्या. या बैठकीस विविध विभागांचे शासकीय अधिकारी, विविध गावांचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.