Breaking News

जगाच्या रक्तातून पोलिओ घालवू या- डॉ.राऊत

बुलडाणा, दि. 03 - आरोग्य हीच संपत्ती म्हटल्या गेले आहे. जनतेचे आरोग्य सुदृढ असणे म्हणजे देशाचे आरोग्य सुदृढ असणे होय. देशाच्या भावी वाटचालीसाठी निकोप पिढ्या जन्माला येणे गरजेचे आहे. पोलिओ मुक्तीच्या दिशेने देशाची यशस्वी वाटचाल ही मोठी उपलब्धी आहे. परंतु केवळ देशातूनच नव्हेतर जगाच्या रक्तातून पोलिओचा विषाणू घालवावा लागणार असल्याचे मत किन्होळा प्रा.आ.वेैंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश राऊत यांनी व्यक्त केले.
आज रविवार 2 एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसछया टप्प्याचा शुभारंभ केळवद म.पु.मा. शाळा येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. चिखली पं.स.च्या सभापती सौ.संगिता पांढरे यांच्याहस्ते बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, भारतात पोलिओचा एकही रुग्ण सापडला नाही. यावरुन आरोग्य विभागाने ही योजना किती प्रभावी राबविली याचा प्रत्यय येतो. परंतु पोलिओचा विषाणू जगाच्या रक्तातून हद्दपार होईपर्यंत ही पोलिओ मुक्त मोहिम गरजेचे आहे. अन्यथा संक्रमणातून संसर्ग होतच राहील, असे त्यांनी सांगितले. तर सभापती सौ.संगिता पांढरे यांनी ग्रामीण भागात बालकांच्या आरोग्याकडे पालकांनी दक्ष राहून लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.साळोख, माजी कृउबास सभापती संजय पांढरे, केळवद सरपंच सौ.द्वारका भोसले, अ‍ॅड.दिपक पाटील,  बुलडाणा येथील सर्जन डॉ.व्यवहारे, रमेश पाटील, बंडू गायकवाड, धनराज पाटील, अशोक भोसले, आरोग्य कर्मचारी डी.एस.गाडे, श्रीमती शालुताई चव्हाण, उषा साखरे, सुलोचना पछहाड, यमुना सोनोने, सोनाली बोरबळे, सुपरवायझर हिवाळे, के.बी.काकडे यांची उपस्थित होती. संचलन मुख्याध्यापक वैजीनाथ गाडेकर यांनी केले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्वैर्स यांनी परिश्रम घेतले.