Breaking News

नांदुर्‍यात 184 कट्टे रेशनचा तांदुळ जप्त

बुलडाणा, दि. 03 -  येथील बुलडाणा रस्त्यावरील बाजार समितीच्या यार्डातील राठी यांच्या शेतातील गोदामावर शनिवारी रात्री तहसिलदार व त्यांच्या चमुने छापा  टाकून रेशनचा 184 कट्टे तांदुळ जप्त केला. रात्री उशीरापर्यंत मालाचा पंचनामा सुरू होता. 
नांदुरा शहराजवळील शांताबाई राठी यांच्या नावे असलेल्या शेतातील गोदामावर प्राप्त माहितीनुसार तहसीलदार वैशाली देवकर, पुरवठा निरीक्षक पेठकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी शनिवर रात्री 9 वाजताच्या दरम्यान छापा टाकला. गोदामातील 184 कट्टे तांदुळ जप्त केला. गोदामाबाहेर शासकीय धान्यासाठी वापरण्यात येणारे रिकामे 24 पोते देखील आढळून आलेत. ते देखील तहसिलदार चमुने ताब्यात घेतले. या मालाबाबत ओम राठी व दिनेश राठी यांनी गायत्री ट्रेडिंग कंपनीचे बिले सादर केली. विशेष म्हणजे राठी यांचे स्वस्त धान्य दुकानाचे दुकान असून ते द्वारपोच योजनेतील माल वाहून नेणारे प्रतिनिधी देखील आहेत.