Breaking News

शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

नवी दिल्ली, दि. 19 - वंदे मातरम हे राष्ट्रगीत शाळांमध्ये अनिवार्य करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. पुढील चार आठवड्यात केंद्र सरकारला उत्तर देण्याचा कालावधी देण्यात आला असून पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. देशात बंधुभाव व राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकाला आदेश द्यावेत, अशी मागणी वकील अश्‍विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रगीताबाबत कोणतीच तडजोड होऊ शकत नाही. मात्र दुर्दैवाने काही जण त्याचा अवमान करतात, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. दरम्यान या याचिकेत राष्ट्रगीताचे अवमान करणा-यांना दंड किंवा शिक्षा करणारा कायदा करण्याची मागणी करण्यास न्यायालयाने याचिकाकर्त्या उपाध्याय यांना परवानगी दिली.