भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांना भेटू देण्यास पाकचा नकार
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यास पाकिस्तानकडून नकार देण्यात आला. त्यामुळे भारताकडून करण्यात आलेी एका प्रयत्नाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार जाधव यांना भेटण्याची राजदूतांना आम्ही देऊ शकत नाही. जाधव यांचा पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. या पार्श्वभूमीवर त्यांना शिक्षा देणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आशिफ गफूर यांनी सांगितले. जाधव प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या नसल्याचे वृत्त पाकिस्तानकडून फेटाळण्यात आले आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनीही कुलभूषण यांना भारतीय राजदूतांना भेटण्याची संधी मिळावी अशी मागणी केली होती.
