सेन्सेक्समध्ये 8 महिन्यांतील उच्चांकी वाढ
मुंबई, दि. 03 - जागतिक संकेत सकारात्मक मिळाल्याने आठवडयाच्या अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स वधारला होता. 145 अंशांनी चढून सेन्सेक्स 27,144 वर बंद झाला. ही आठ महिन्यांतील उच्चांकी वाढ आहे. एनएसईचा निफ्टी निर्देशांकही 8,328 वर बंद झाला.
याअगोदर सेन्सेक्स 26 ऑक्टोबर 2015ला या स्तरावर बंद झाला होता. तर निफ्टी दहा महिन्यातील उच्चांकी स्तरावर बंद झाला. 20 ऑगस्ट 2015नंतर प्रथमच निफ्टीने 8,300चा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी सर्वाधिक
खरेदी मिडकॅपच्या समभागांमध्ये झालेली दिसली. मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वाढला.
जून महिन्यात उत्पादन क्षेत्राने तीन महिन्यातील उच्चांकी झेप घेतल्याचा उत्साह गुंतवणूकदारांत पसरला होता. त्यामुळे सेन्सेक्सने 8 महिन्यातील उच्चांक गाठला. मान्सूनच्या प्रगतीमुळे भारताच्या विकासाच्या गाथेत परदेशी गुंतवणूकदारांना रस निर्माण झाला आहे.
संपूर्ण आठवडयात सेन्सेक्स तब्बल 747.20 अंशांनी चढला आहे. निफ्टी 239.75 अंशांनी वधारला. 27 मेनंतर प्रथमच दोन्ही निर्देशांकांनी एवढी झेप घेतली आहे. मध्यवर्ती बँक ब्रेक्झिट प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याची आशा आणि रुपयाच्या किमतीत सुधारणा यावर सेन्सेक्सची उसळी आधारली आहे. 30 समभागांच्या सेन्सेक्समध्ये 18 समभाग वधारले.
ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 3.72 टक्क्यांनी तेजीत राहिले. त्याखालोखाल एल अँड टी, आयटीसी, डॉ. रेड्डीज आणि गेलचा क्रमांक लागला.