इंदूर कसोटीत जाडेजाला दंड
इंदूर, दि. 10 - भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजावर इंदूर कसोटीत खेळपट्टीचे नुकसान केल्याप्रकरणी आयसीसीने दंडाची कारवाई केली आहे. भारताच्या पहिल्या डावात एकेरी-दुहेरी धावा घेताना जाडेजा जाणूनबुजून खेळपट्टीच्या मधोमध धावत होता.
पंचांनी त्याला वारंवार ताकीद देऊनही त्याने आपल्या वागणुकीत सुधारणा केली नाही. त्यामुळे अखेर पंचांनी जाडेला पेनल्टी म्हणून न्यूझीलंडला पाच धावांचा बोनस दिला. त्यामुळे एकही चेंडू न खेळता न्यूझीलंडच्या खात्यात पाच धावा जमा झाल्या. दरम्यान, दुसर्या दिवसाचा खेळ थांबल्यावर सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी जाडेजाला सामन्यातील मानधनाच्या पन्नास टक्के दंड ठोठावला.