Breaking News

नंदी गणेश मंडळाला शासनाचे तिसरे पारितोषिक

लातूर (प्रतिनिधी), दि. 24 - येथील ओम श्री नंदी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या 2016 लोकमान्य गणेशोत्सव अभियानाचे तृतीय पारितोषिक स्विकारले.
हा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित, आ. आशिष देशमुख, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे वल्सा नायर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ओम श्री नंदी गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत हिरेमठ, उपाध्यक्ष सचिन दाताळ, सचिव मनोज थिटे यांनी मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकमान्य  गणेशोत्सव अभियानांतर्गत सार्वजनिक गणेश मंडळास उत्कृष्ट सजावट व सांस्कृतिक उपक्रमाचे तृतीय पारितोषिक स्विकारले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी केले.  ओम श्री नंदी गणेश मंडळाचे प्रशांत पाटील ,महादेव मुळे गिरीश पाटील, राहुल तुंगे, सुनील अदरंगे, तेजस तिडके, विशाल विहिरे, शहाजी माने, महेश देवणे, गजानन मल्लाळे ,राजीव काळे ,गजानन खमितकर ,काळदाते ,आर के ,ठाकूर  इत्यादी लोकांनी  सजावटीसाठी परिश्रम घेतले  होते.