Breaking News

न पिणार्‍यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का? : अजित पवार

सांगर्ली, दि. 26 - पिणार्‍याकडून घ्यायचा टॅक्स न पिणार्‍यांकडून घेताना लाज वाटत नाही का, अशा शब्दात पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारुबंदीमुळे बुडालेल्या महसुलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारनं पेट्रोलवर 3 रुपये अधिभार लावला आहे. त्यामुळे पेट्रोल दरात महाराष्ट्र देशात सर्वात महागडं राज्य आहे.