Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसविण्याची मागणी

बुलडाणा, दि. 28 - शहरा मधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गावरुन अहोरात्र भरधाव वेगाने वाहने चालत असतात. शहरातुन जाणार्‍या या महामार्गावर कोणत्याही ठिकाणी गतीरोधक नसल्यामुळे आजपर्यंत अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर गतीरोधक बसविण्यात यावे या करीता ओम साई फाऊंडेशनच्या वतीने तहसिलदार यांना 265 नागरीकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले. 
शहरातील डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी, शेत
करी व सर्वसामान्य नागरीकांनी राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसविण्यात यावे या करीता शासनाकडे विनंती केली आहे. या करीता ओम साई फाऊंडेशन चे अध्यक्ष विलास निंबोळकर, नगर सेवक अजय घनोकार, नांदुरा तालूका पत्रकार संघाचे यशवंत पिंगळे, विदर्भ मतदार चे जिल्हा संपादक बावने तसेच ओम साई फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातुन जाणार्‍या मार्गावर विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय, जगप्रसिध्द हनुमान मुर्ती, दिवाणी न्यायालय, बसस्थानक, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, रेल्वे स्थानक तसेच शाळा कॉलेज असल्यमुळे नागरीकांना नेहमी रस्ता ओलांडून जावे लागते. या मार्गावर कोठेही गतीरोधक नसल्यामुळे वाहन चालक आपल्या वाहनाचा वेग कमी रीत नाही. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात होत असतात. नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची असल्यामुळे शासनाने कायदा व नियम या पेक्षा नागरीकांच्या जीवीताला अधिक महत्व देवून या मार्गावर गतीरोधक बसविण्याची व्यवस्था करावी. नांदूरा शहरात राष्ट्रीय महामार्गावर भविष्यात अपघात घडणार नाही या करीता शासनाने जातीने लक्ष घालून गतीरोधक बसविण्याची व्यवस्था करावी करीता ओमसाई बहूउद्देशीय फाऊंडेशन या सामाजीक संस्थेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले आहे.