Breaking News

मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर षष्मुखराजन रूजू

बुलडाणा, दि. 28 - धारणी येथील प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी पदावरून बदली झालेले षण्मुखराजन आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झाले. त्यांनी श्रीमती दिपा मुधोळ यांच्याकडून या पदाचा पदभार स्वीकारला.
त्यांनी बी.ई इलेक्ट्रॉनिक्स व एमबीए (वित्त) या पदव्या मिळविल्या आहेत. ते 2013 च्या महाराष्ट्र कॅडरचे आयएएस असून अमरावती येथे परिविक्षाधीन कालावधीमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच डिसेंबर 2015 पासून धारणी येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी पदावर ते काम करीत आहे. राज्य शासनाचे ग्रामविकासासंदर्भात तथा प्राधान्यक्रम असलेले उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी काम केले जाणार आहे. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने प्रशासन गतिमान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.