काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. ए. के वालिया यांचा राजीनामा
नवी दिल्ली, दि. 03 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत तिकिट वाटपामुळे नाराज झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. ए. के वालिया यांनी राजीनामा दिला. मात्र, अद्यापही काँग्रेसने वालिया यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया वालिया यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात वालिया मंत्री पदावर कार्यरत होते. वालिया हे शीला दीक्षित यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात वालिया मंत्री पदावर कार्यरत होते. वालिया हे शीला दीक्षित यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.