अतिक्रमण हटाव मोहीम मनमानी पध्दतीने- अॅड. जोंधळे
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 28 - कोणत्याही नागरीकांना पूर्व सूचना न देता जागांचे मोजमाप न करता शासन व नगरपालकेतर्फे सुरु असलेली ही मोहिम मनमानी पध्दतीने चालू असल्याचा आरोप येथील संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व विधीतज्ञ अॅड. संग्राम जोंधळे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासकीय कार्यालयाकडे उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी व यंत्रसामुग्रीचा मोठा पौज फाटा उभा करुन अतिक्रमणाच्या नावाखाली अनेकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम सुरु आहे. काही नागरीकांना न्यायालयात जावून मनाई हुकूम मिळाला. परंतु सगळेच प्रस्तापित न्यायालयात जावू शकले नाहीत. मुळातच ही अतिक्रमणे व्हायला नकोत. शहरातून जाणारे रस्ते हे वर्तमान व भविष्य काळाचा विचार करुन प्रशस्त असलेच पाहिजेत. परंतु या अतिक्रमांना येथील प्रशासनच जबाबदार आहे. यात लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा मोठा वाटा आहे. अतिक्रमीत भागातील व्यवसायावर एखाद्याचा संसार चालत असेल तर त्यांचे योग्य पुनर्वसन झाले पाहिजे. आधी पुनर्वसन मग अधिग्रहन ही शासनाची भूमिका आहे. विजय मल्ल्यासारख्यांना येथे कोटींचे कर्ज दिले जाते. मात्र कष्ट करणारांवर हातोडा फिरवला जातो.
सुरु असलेल्रा या मोहिमेत खाजगी मिळकती अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार नियमबाह्य पध्दतीने पाडण्यात आला आहेत. वास्तविक जुना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा शहरातून जात आहे. त्याचे आता शहराबाहेर स्थलांतर हेावून महामार्ग क्रमांक 60 झाला आहे. शहराबाहेर असलेल्या महामार्गाच्या हद्दीचे नियम गावठाण क्षेत्राला लागू नसतात असे अॅड. जोंधळे यांनी सांगून सुरु असलेली ही कारवाई एकतर्फी आहे.अधिकारीवर्ग काही एक म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याने नागरीकांनी एकत्र यावे असे आवाहन देखील अॅड. संग्राम जोंधळे यांनी केले आहे.