Breaking News

स्नेहल मांढरे आर्चरी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील पांडेवाडी येथील स्नेहल विष्णु मांढरे हिची 14 ते 22 मे दरम्यान चीन येथील शांगाय शहरात होणार्‍या वर्ल्डकप स्टेज फर्स्ट व 4 ते 12 जून दरम्यान वर्ल्डकप स्टेज 2 साठी अंठालिया टर्की येथे होणार्‍या धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.  
स्नेहल मांढरे हिचे वडील भुईज येथील कारखान्यात कामाला होते तर आई शेतमजुर. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाचवड येथे पूर्ण केल्यावर किसान वीर महाविध्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश मिळवला. कोच मिलिंद खामकर यांनी आर्चरी खेळाबाबत सुचवले. चंद्रकांत भिसे यांच्याकडे हा खेळ शिकण्यास तिने प्रारंभ केला. त्यानंतर ती वाई येथील ओम श्री अ‍ॅकॅडमीमध्ये प्रणीत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाला सुरुवात केली.
मुंबई येथे सप्टेंबर 2014 मध्ये पहिले ब्रांझ पदक मिळवले. दिल्लीमध्ये टीम ला ब्राझ पदक मिळाले. भारतीय संघात समावेस व्हायचा असेल तर टॉप 32 मध्ये येणे गरजेचे असते परंतू ती 16 व्या स्थानी होती. त्यामुळे नॅशनल गेम व ऑल इंडिया गेम ही खेळू शकले. तिथे ब्रांझ पदक मिळाले. स्नेहल हिचा खेळ पाहून डोर्फ केतेल केमिकल इंडिया प्रा, लि या कंपनीने 6 लाखाची स्पोंसरशिप मिळाली. सराव सुरु असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पंजाब यूनिर्व्हसिटीतर्फे पटियाला येथे ट्रेनिंगदरम्यान सुरेंद्रसिंह रनदावा यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे भारतीय संघात प्रवेश मिळण्याची संधी मिळाली. वर्ल्डकपसाठी भारतीय संघात दिव्या दयाल (हरियाणा) ज्योति सुरेखा (आंध्रप्रदेश) स्नेहल मांढरे (महाराष्ट्र) व प्रविणा (पंजाब) या 4 मुलींचा समावेश झाला. भविष्यात आम्ही देशासाठी सुवर्णपदक मिळवू असा विश्‍वास मांढरे हिने बोलताना व्यक्त केला.