Breaking News

शहराच्या प्रवेश चौकाचे चुंडीराज महाराज कविश्‍वर चौक नामकरण

बुलडाणा, दि. 03 - बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत प्रवेश करतांनाच्या चौकास चुंडीराज महाराज कविश्‍वर चौक असे नाव देण्याचा ठराव 27 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुर झाला. या चौकात नामफकाचे अनावरण 31 मार्च रोजी नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. 
जालना कडून शहरात येणार्या मार्गावर चुंडीराज महाराज मठ आहे. हा मुख्य मार्ग थेट बालाजी महाराज मंदिरापर्यंत जातो.या चौकास चुंडीराज महाराज चौक असे नाव देण्याची मागणी गेल्या बर्याच दिवसांपासून नागरीकांतून होत होती. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामकरणाचा निर्णय संमत करण्यात आला. 31 मार्च रोजी या चौकात फलक लावून त्याचे अनावरण नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. रामदास शिंदे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, विमल माळोदे, पल्लवी वाजपे, शारदा जायभाये, वसंतअप्पा खुळे, विजय देवउपाध्दे, प्रविण धन्नावत, मोरेश्‍वर मिनासे, डॉ.शंकर नलबे, जगदिश कापसे, प्रविण बन्सिले, राजाभाऊ टाकळकर, ओमप्रकाश धन्नावत, जुगलकिशोर धन्नावत, अनिल मल्लावन, मल्हार वाजपे, मयुर पुजारी, सलीम पठाण, सुधाकर जायभाये, नवनाथ गोमधरे, अनिल कासारे, इस्माईल बागवान, कैलास धन्नावत, प्रा.गजानन गाडेकर, अंकुश धन्नावत आदि उपस्थित होते.