Breaking News

रेल्वेवर आधारित उद्योग बीड जिल्ह्यात आणण्याची पंकजा मुंडेंची रेल्वेमंत्र्यांकडे शिफारस

नवी दिल्ली, दि. 25 - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त 3 जून रोजी गोपीनाथ गडावर होणार्‍या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली. रेल्वेवर आधारित उद्योग बीड जिल्ह्यात आणावेत, अशी शिफारस त्यांनी यावेळी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
पंकजा मुंडे आज नवी दिल्ली येथे दौर्‍यावर होत्या. आज त्यांवेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. आरोग्य शिबीर, अपंगांना साहित्य वाटप, गरजूंना मदत, महिला बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज वाटप, शेतकयांना मदत आदी कार्यक्रमांमधून सामाजिक उत्थानाचे काम गडावर होते. यंदाही असे उपक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे अशी विनंती मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली. प्रभू यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, परळी - बीड - नगर रेल्वेच्या सध्या सुरू असलेल्या कामाबाबत मुंडे यांनी या भेटीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या मार्गासाठी भरीव निधी देऊन रेल्वे मार्गाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला गती दिल्याबद्दल तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही आज मुंडे यांनी नवी दिल्लीत भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी श्री. अमित पालवे हे देखील उपस्थित होते.