Breaking News

सरकारी पातळीवर मार्गदर्शक संस्था उभारणार

पिंपरी, दि. 25 - दलित महिलांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी एका महिन्यात सरकारी पातळीवर मार्गदर्शक संस्था उभारणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. डॉ. गौतम बेंगाळे आणि डॉ. प्रशांत साठे यांनी लिहिलेल्या आणि ‘ग्राफीक्स प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘दलित महिला उद्योजक’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री. कांबळे बोलत होते. ‘बीएमसीसी’चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. मुकुंद तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कांबळे पुढे म्हणाले की, चार टक्के दराने कर्ज पुरवठा, एमआयडीसीत 10 टक्के आरक्षण, मुद्रा कर्जासाठी प्राधान्य अशा सवलती सरकार देत आहे. त्याचा दलित युवकांनी फायदा करून घ्यावा. महिलेच्या नावावर सात बारा असेल तर शेतसारा माफीचा निर्णय करणार आहे.