Breaking News

जिल्हा परिषदेतील चारही विषय समित्या आघाडीच्या ताब्यात

अहमदनगर, दि. 04 - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबरोबरच महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अर्थ व बांधकाम तसेच कृषी व पशुसंवर्धन समिती या चारही समित्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले. चारही समितीसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेसच्या वाट्याला महिला व बाल्याण, कृषी व पशुसंर्धन तर राष्ट्रवादीकडे अर्थ व बांधकाम, समाजकल्याण समिती आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या भाजपने मात्र विषय समितीच्या निवडणुकीत अर्ज भरला नाही. 
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल्याण, कृषी व पशुसंर्धन, अर्थ व बांधकाम, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी आज जिल्हा परिषद सभागृहात निवडणूक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षेतील निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याल आले. समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी उमेश परहर (राष्ट्रवादी काँग्रेस),अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदासाठी कैलास वाकचौरे (राष्ट्रवादी काँग्रेस) , महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी अनुराधा नागवडे (काँग्रेस), कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदासाठी अजय फटांगरे (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी होवून दुपारी 3 वाजता विशेष सभेत सभापतीपदाची निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचा भ्रमनिराश ः अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीला मतदान केले होते. चार समित्यांपैकी एक समिती शिवसेनेला द्यावी, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र शिवसेनेला एकही समितीचे सभापतीपद मिळाले नाही.