Breaking News

वाढदिवस रस्त्यात साजरा करणार्‍या कराडमधील आठ युवकांवर कारवाई

कराड, दि. 16 (प्रतिनिधी) : शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारूती मंदीर परिसरात गुरूवार, दि. 13 रोजी रात्री रस्त्यात वाढदिवस साजरा करताना आढळून आलेल्या आठ युवकांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
कराड शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावेळी आरडा-ओरडा व शांततेचा भंग होत असतो. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्‍यांना रोखण्यासाठी शितल शरद रामाजे (वय 12 रा. शनिवार पेठ कराड), महेश सर्जेराव पाटील (वय 25), निखिल तानाजी शिंदे (वय 27), प्रसाद अनंत कुलकर्णी (वय 21), मोहसीन रफीक शेख (वय 27), रोहीत रामचंद्र भोईटे (वय 29), रविराज मधुकर शिंदे (वय 31 सर्व रा. मंगळवार पेठ कराड), अंतरिक्ष अशोक महेकर (रा. वाखाणरोड कराड) या आठ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.