Breaking News

सम्राटनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी

शेणोली, दि. 16 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिठीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. 
दि. 13 रोजी रात्री 12 वाजता सामुदायिक बौध्द वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाळणा गाऊन त्यांच्या विचारांचा जागर केला. दि. 14 रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धां घेण्यात आल्या. सिध्दार्थ तरुण मंडळाच्या वतीने कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत करण्यात आले. रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिरवणुकीत बौध्द बांधवान सह इतर समाज्यातील लोक सहभागी झाले होते.
सेवानिवृत्त कृषी अधिकारी संजय गोविंद गायकवाड यांच्या माध्यमातून विविध शालेय क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. या स्पर्धेत शोनोली येथील संजीवनी विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक मुले शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक मुली शाळा, आणि सदगुरु आश्रम शाळा शेरे येथील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, विजेत्या स्पर्धकांना कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक कश्यप सर यांच्या व संजीवनी संस्थेचे एस. पी. निकम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्सव यशस्वी करण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिठीच्या सदस्यानी विशेष परिश्रम घेतले. शेणोली ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी केली. यावेळी कृष्णा कृषी संघाचे चेअरमन सुनील संपत कणसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अमोल पाटील, सुनील शामराव कणसे, कोयना बँकचे चेअरमन रोहित पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रताप कणसे, आबासो कणसे, विजय पाटील, अमोल गायकवाड, निखिल गायकवाड, भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका स्वाती गायकवाड, प्रल्हाद कापुरकर, संजय कणसे, शशिकांत कणसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिठी अध्यक्ष संपतराव गायकवाड, विद्याधर गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदादिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.