Breaking News

मिनी बस-ट्रकच्या धडकेनंतर आग, 20 मुलांचा होरपळून मृत्यू

प्रेटोरिया, दि. 22 - दक्षिण आफ्रिकेत मिनी बस आणि ट्रकच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत 20 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रेटोरिया शहरात शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली. अपघातात मिनी बसच्या चालकाचाही मृत्यू झाला. तर ट्रक चालक सुरक्षित आहे.
मिनी बसच्या चालकाला ट्रकचा वेग लक्षात न आल्याने वळणावर मिनी बस ट्रकला जाऊन धडकली. यामुळे मिनी बस पेटली. बसमध्ये अडकल्याने मुलांचा होरपळून मृत्यू झाला. बचाव दलाने सात मुलांची आगीतून सुटका केली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.