Breaking News

वडूजमध्ये वाहन तपासणी मोहीम; 11 हजाराचा दंड वसूल

वडूज, दि. 27 (प्रतिनिधी) : वडूजमधील वडूज-दहिवडी रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिराशेजारी पोलिसांनी अचानक वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर उतरून वाहन चालकांची तपासणी करून 10 हजार सातशे रुपयांचा दंड वसूल केला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवडाभर वाहतूक नियमनासाठी वाहनांची, वाहन चालकांची तपासणी सुरु आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, पोलीस सहायक हवालदार नितीन निकम यांच्या सहकार्‍यांनी वडूज-दहिवडी रोडवर धडक मोहीम राबवून वाहनांच्या तपासणीची मोहिम राबविली.  रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना थांबवून कागदपत्रांसह त्यांची तपासणी केली. धडक मोहिमेमुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.