Breaking News

कोपरगांव तालुक्यातील पिण्यांच्या पाण्याच्या योजनांसाठी 1 कोटी 29 लाख मंजुर-कोल्हे

अहमदनगर, दि. 26 - शासनांच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत  तालुक्यातील उक्कडगाव व कोळगाव थडी हया पाणी योजनांच्या कामांसाठी 1 कोटी 88 लाख रूपये खर्चाच्या प्रषासकीय प्रस्तावास पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडुन मान्यता मिळविली असल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
आमदार कोल्हे पुढे म्हणांल्या की तालुक्यातील प्रलंबित पिण्यांच्या पाण्यांच्या योजनांबाबत आपण सांतत्यांने पाठपुरावा करून याबाबत मंत्रालय स्तरावर 24 मार्च रोजी मंत्री लोणीकर व प्रधान सचिव व पाणी पुरवठा योजनांच्या अधिका-यासोबत बैठक घेतली होती त्यात उक्कडगांवसाठी 1 कोटी 29 लाख 34 हजार तर कोळगांवथडी साठी 59 लाख 51 हजार रूपये खर्चच्या प्रषासकीय कामकाजास मान्यता घेतली आहे.  यासाठी माजीमंत्री षंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी देखील सातत्यांने प्रयत्न केले.   कोपरगांव षहरासाठी साईबाबा समाधी षताब्दी सोहळयाअंतर्गत निळवंडे षिर्डी ही पिण्यांच्या पाण्यांची योजना षिर्डी ते कोपरगांव अषी प्रस्तावीत करण्यांत आली असून त्याबाबतचीही मंजुरी आपण मिळविली आहे, त्याचाही पाठपुरावा सुरू आहे.   उक्कडगावाला बाराही महिने पिण्यांच्या पाण्यांसाठी टँकर द्यावा लागत होता, मध्यंतरी दुश्काळात या गांवातील रहिवासीयांचे मोठया प्रमाणांत पाण्यांसाठी हाल झाले. षिवाय जागृत देवस्थान श्री रेणुकादेवी दर्षन व नवस फेडण्यांसाठी येथे देषभरातील भाविक येत असतात त्यांनाही पिण्यांच्या पाण्यांची अडचण तयार होते त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यांचा आपण प्रयत्न केला आहे. या दोन्ही योजनांच्या  खर्चास तांत्रीक प्रषासकीय मान्यता मिळवुन घेवुन त्यासाठी ई निवीदा मागविल्या जाणार आहे, ही कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावीत असाच आपला प्रयत्न आहे.  या योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रषासकीय मान्यता दिल्याबददल त्यांचे तालुक्याच्यावतींने सौ कोल्हे यांनी आभार व्यक्त केले आहे.