Breaking News

पुढील चंदन उटी सोहळ्यापूर्वी फुले दांपत्याना भारतरत्न पुरस्कार-पंकजा मुंढे

अहमदनगर, दि. 26 - फुले दांपत्याना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे असा प्रस्ताव राज्य शासनाने  केंद्र शासनाकडे दाखल केलेला आहे.पुढील चंदन उटी सोहळ्या पूर्वी फुले दांपत्याना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळेल असा आशावाद राज्याच्या ग्रामविकास व महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे यांनी व्यक्त केला.
अरण(ता.माढा) येथे चंदन उटी सोहळ्यानिमित्त सावता परिषदेने आयोजित केलेल्या माळी समाज मंथन मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ना. मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजयुमो चे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर होते. उदघाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ना.मुंढे पुढे म्हणाल्या,ज्यांचा कोणी वाली नाही अशा धनगर,कुंभार,वंजारी, गरीब मराठा या समाजाला एका टोपलीत घेवून त्यांचे संरक्षण, आरक्षण मिळविण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी खंबीरपणे उभा राहणार असल्याचा विश्‍वास ग्रामविकास मंत्री ना.मुंडे यांनी मंथन मेळाव्याला दिला.
महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांमत्याला मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार द्यावा यासाठी राज्य सरकारने ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे एक वर्षाच्या आत हा पुरस्कार दिला जाईल या साठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी समाजाला न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या अगोदरच्या सत्ताधार्‍यांनी कायम दूर्लक्ष केले पण आता आमच्या सरकारकडून समाजाच्या प्रत्येक प्रश्‍नाला न्याय मिळतोय. आमची मानसिकता समाजाच भल करण्याची असल्याने त्यांना न्याय देण्यासाठीच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या तीर्थक्षेत्र अरण(ता.माढा) चा सर्वांगिण विकास करण्यासाठी पर्यटन खात्याचे मंत्री यांचेसोबत बैठक लावू , अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करू यासाठी तात्काळ निर्णय घेणार असल्याचे ना.मुंडे यांनी सांगितले.
सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी प्रास्ताविक केले.माळी समाजाच्या मागण्या मांडल्या. मंथन मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. तीर्थक्षेत्र अरणच्या सर्वांगिण विकासासाठी ना.मुंडे यांनी योगदान दिले आहे.त्यांनी सुमारे 2 कोटी रूपये निधी दिला आहे.त्याही विकास कार्यात सहभागी झाल्या आहेत अशी माहिती प्रास्ताविकातून श्री. आखाडे यांनी दिली.
आमदार मनीषा चौधरी,नामदेव राऊत, अनिल गदादे,मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर,सर्जेराव तांदळे, अ‍ॅड.भगत, शंकरराव वाघमारे अ‍ॅड. भानुदास राऊत,महादेव राऊत,रमेश वसेकर यांची भाषणे झाली.
यावेळी माळी भूषण पुरस्काराने रंजनाताई टिळेकर,राजीवजी बनकर,डॅा.प्रभाकर माळी,अर्जुन हेगडे,सुरेश शेंडे,अरूण म्हसवडे,महादेव राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सावता परिषद प्रदेश  महासचिव  मयूरराजे वेद्य  तरवडीचे युवा नेते अमोल पुंड सर्जेराव तांदळे तुषार वेद्य निखील शेलार गणेश शिवणकर बाळासाहेब ससे सावता हिरवे अशोक साखरे बाळासाहेब विधाटे राहुल पुंड    नगरसेवक संतोष लोंढे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजी कांबळे,बाळासाहेब माळी,मयूर वैद्य,निशिगंधा माळी,पांडुरंग राऊत, सुनंदा गाजरे,मृदूल माळी, भारत कुबेर,सावता हिरवे,गोरख आळेकर,स्मिता तरटे ,सचीन मलंगणेर,अशोक पेहरकर,अमोल नांगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजीव काळे यांनी केले.