विश्वविजेत्या भारतीय संघात सहभाग क्रिकेटपटू अनिस बेगचे नाशिकमध्ये स्वागत
नाशिक, दि. 09 - अंधांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा नाशिकरोडचा भूमिपुत्र अनिस बेग याचे सोमवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले. सजविलेल्या अश्वावर बसवून त्याची मिरवणूक काढण्यात आली.
अनिस हा मूळचा सुभाष रोड येथील पवार वाडीत राहतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने ही आकाशाला गवसणी घातली आहे. जन्मत:च तो अंध असून, अनेक संकटांवर मात करून त्याने भारतीय संघात स्थान मिळविले आहे. ढोल ताशांच्या गजरात अनिसला सजविलेल्या अश्वावर बसवून मिरवणूक काढण्यात आली.
त्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले आ. योगेश घोलप मित्र मंडळाचे रॉनी लव्हेरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, नारायण न्याहळदे, रेल्वे सुरक्षा दलाचे जे. ए. पठाण, मंगेश मगर, अस्लम मणियार, हरीष भडांगे, संतोष क्षीरसागर, अन्वर तांबोळी, बबलू भागवत, श्याम गोहाड, लतिफ शेख, स्वप्नील दोंदे, रोहित लव्हेरी, राहुल चटोले, सचिन मेहरोलिया, बबलू तांबोळी आदी उपस्थित होते.