महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
नाशिक, दि. 09 - समाजाच्या प्रत्येक बाबीत महिलांचा समावेश असल्याने त्यांनी सक्षम होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. विद्यापीठातील सर्व महिला अधिकारी व कर्मचार्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, मागील काही वर्षात सर्वत्र मुलींचा जन्मदर कमी झाला होता. त्यामुळे तो वाढविण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना आखण्यात आल्या. एवढेच नव्हे तर अनेक चांगले उपक्रमही आमलात आणणे सुरू आहे. त्यामुळे मुला-मुलींच्या जन्मदरात असलेली तफावत दूर होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. महिलांनीआपल्यात असलेले गुण, कौशल्य सर्वासमोर मांडले पाहिजे. महिलांनी स्वत:ची शक्ती ओळखुन होणार्या अन्यायाविरुध्द उभे राहिले पाहिजे. तसेच दैनंदिन जिवनात येणार्या अडचणींवर सकारात्मक विचार करुन मात करायला शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रति-कुलगुरु मा.डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, घरातील नाती जपुन संसारात येणार्या जबाबदार्या स्विकारुन सकारात्मक पध्दतीने पुढे जायला हवे. संस्कारक्षम समाज घडविण्यामागे नारीशक्तीचे योगदान मोठे आहे कारण प्रत्येक स्त्री हि आई, बहिण, पत्नी या वेगवेगळया रुपात घरात वावरत असते. आज संस्कृती जपण्याचे काम स्त्रीशक्ती करत आहे.
प्र.कुलसचिव मा.डॉ.कालिदास चव्हाण म्हणाले की, आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने प्रगतीच्या यथोगाथावर पोहविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. सक्षम होण्यासाठी ज्ञानाबरोबर महिलांनी व्यायाम, उत्तम आरोग्य, आहार याचे सेवन करावे व अत्यााधुनिक तंत्राचा देखील स्वत:च्या सुरक्षतेसाठी वापर करावा असे सांगितले. यावेळी विद्यापीठातील म हिला अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.