पोलीस भरतीसाठी अडीच हजार अर्ज
नाशिक, दि. 09 - शहर पोलीस दलाच्या शिपाईपदाच्या भरतीसाठी गेल्या दहा दिवसांत 2600 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 79 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात असून, आलेल्या अर्जांमध्ये दोन हजार 300 अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात आले आहेत, त्यात 300 महिला उमेदवारांचा समावेश आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील शिपाईपदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार 75 टक्के म्हणजेच 79 जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. दि. 24 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली असून, इच्छुकांनी दि. 17 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
